'ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम आता थेट आपल्या घरात येवून पोचलेत. ॠतूचक्रात झालेले तीव्र बदल आपण सारे भोगतो आहोत.
वेळीच जागे झालो नाहीत तर येणाऱ्या पिढ्या अन् निसर्ग आपल्याला क्षमा करणार नाही.
खरंतर हे आपल्याला माहीत आहे. पण पर्यावरणासंदर्भात 'नेमकं' काय करता येईल हे सुचत नाहीय..खरं ना?
म्हणूनच आम्ही काही गोष्टी सुरू केल्या. तुम्हीही त्या करू शकता. अगदी सहज. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि सातत्य मात्र पाहिजे.